बनावटीचे पिस्टल व काडतूस घेऊन आलेल्या व्यक्तीला सापळा लावून अटक

बनावटीचे पिस्टल व काडतूस घेऊन आलेल्या व्यक्तीला सापळा लावून अटक

महापे एमआयडीसीतील गवळीदेव डोंगराजवळ देशी बनावटीचे पिस्टल व काडतूस घेऊन आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने बुधवारी सायंकाळी सापळा लावून अटक केली आहे. अयाज शफि मन्सुरी, असे या व्यक्तीचे नाव असून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या जवळ असलेले देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतूस जप्त केले आहे. या व्यक्तीने सदरचे पिस्टल कुठुन व कशासाठी आणले याबाबत गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

महापे एमआयडीसीतील गवळीदेव डोंगराजवळ येणाऱ्या व्यक्तीजवळ बेकायदेशीर अग्निशस्र असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी व त्यांच्या पथकाने गवळी देव डोंगरालगत सापळा लावला होता. सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी संशयीत व्यक्ती आला असताना, गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन त्याची झाडा-झडती घेतली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in