शेकापच्या उपसरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

सामर शरद पाटील, अमीर शरद पाटील, वैभव कान्हा फडके यांनी भाजपमध्ये सहभागी होत विकासाचे कमळ हाती घेतले आहे
शेकापच्या उपसरपंचांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : चिपळे ग्रामपंचायतीमधील शेकापचे विद्यमान उपसरपंच मुकेश फडके, माजी ग्रामपंचायत सदस्य कान्हा फडके, बळीराम बारकू फडके, दिनेश बळीराम फडके, सामर शरद पाटील, अमीर शरद पाटील, वैभव कान्हा फडके यांनी भाजपमध्ये सहभागी होत विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. मार्केट यार्डमधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, चिपळेचे माजी सरपंच रमेश पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, स्वप्निल पाटील, किशोर फुलोरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in