दहावीपर्यंत मराठी सक्तीची करावी; राज ठाकरेंची शालेय शिक्षण मंत्र्यांना विनंती

राज ठाकरेंनी यावेळी आपण कडवट मराठी असल्याचा उल्लेख करत माझ्यावर संस्कारच त्या प्रकारचे झाले आहेत.
दहावीपर्यंत मराठी सक्तीची करावी; राज ठाकरेंची शालेय शिक्षण मंत्र्यांना विनंती

नवी मुंबई : प्रत्येक मराठी भाषिक माणसाने समोर येणाऱ्या मग तो कोणत्याही भाषेचा पुरस्कर्ता असो, त्याच्यासोबत मराठी भाषेतूनच संवाद साधला पाहिजे. तसे सांगत राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी, अशी विनंती राज ठाकरेंनी यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केली. तसेच, समोर येणाऱ्या प्रत्येकाशी मराठीतच बोला, असे आवाहनही राज ठाकरेंनी उपस्थितांना केले. ते वाशी येथे आयोजित विश्व मराठी संमेलन-२०२४ मध्ये बोलत होते.

माझ्यावर संस्कारही त्याचप्रकारचे झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरूपात झाले. बाळासाहेबांचे, माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसजसे समजत गेले, तसातसा मी आणखी त्याच्या प्रेमात पडत गेलो. जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंडळाने आमंत्रण दिले. त्याचे अध्यक्ष मला भेटले त्यांनी मला सांगितले की, आम्ही अमेरिकेत १०० मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरू होतात, हे काही कमी आहे का? महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य शासनाने अनिवार्य करा, बाकी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आम्ही पाहून घेऊ, असे परखड मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळांसाठी मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केली असल्याची माहिती दिली. ज्यावर, राज ठाकरे यांनी शिक्षकही व्यवस्थित ठेवा, अन्यथा त्रास होतो, असा राजकीय चिमटाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला.

हिंदी ही फक्त केंद्र आणि राज्य यामध्ये संवाद साधण्यासाठीची प्रशासकीय मान्यताप्राप्त भाषा असून, ती राष्ट्रीत भाषा नसल्याचे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी गुजरात हायकोर्टाच्या निकालाचा हवाला देत अधोरेखित केले. जर पंतप्रधान आपल्या स्व-राज्याची भाषा, संस्कृती आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना दाखवून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आपण का मागे पडायचे? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी हे जर त्यांचे स्वतःचे राज्य आणि भाषेवरील प्रेम लपवू शकत नसतील तर तुम्ही आम्ही ते का लपवता असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी उपस्थितांना केला. जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशीच हिंदीसुद्धा भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही, राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा ठेवल्या पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मी कडवट मराठी

राज ठाकरेंनी यावेळी आपण कडवट मराठी असल्याचा उल्लेख करत माझ्यावर संस्कारच त्या प्रकारचे झाले आहेत.आजोबांचे पुस्तकरूपात झाले. मी आजपर्यंत मराठी विषयावर तुरुंगातही जाऊन आलो आहे. आपण आधी महाराष्ट्रात लक्ष देणे गरजेचे असून महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी सोडून जेव्हा हिंदी माझ्या कानावर येते, तेव्हा त्रास होण्यास सुरुवात होत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. त्याचबरोबर भाषेला विरोध नाही, मात्र हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. जशा इतर भाषा आहेत, तशीच हिंदी एक भाषा आहे. देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नसल्याचे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in