क्रेडाई आणि बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईतर्फे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन

क्रेडाई आणि बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईतर्फे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन

क्रेडाई आणि बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) यांच्या वतीने २० वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन येत्या १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत भरविण्यात येणार आहे. सदरचे प्रॉपर्टी प्रदर्शन वाशी रेल्वे स्थानक जवळील सिडको एविझबिशन सेंटरच्या बाजुला असणाऱ्या महभूखंड क्रमांक-११ ते १४ वर भरविले जाणार आहे.

या प्रॉपर्टी प्रदर्शनात नवी मुंबईतील २० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपये किंमत असणाऱ्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सदरचे प्रदर्शन होत असून या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी माहिती ‘बीएएनएम'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रॉपर्टी प्रदर्शनात एकाच छताखाली जवळपास १०० हुन अधिक बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी या प्रदर्शनाद्वारे पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील घरांच्या किंमतीच्या तुलनेत नवी मुंबईत सर्वसामान्यांना विकायतशीर आणि परवडणारी घरे खरेदी करता येणे शवय होणार आहे. तसेच येणाऱ्या ग्राहकांना विकासकांशी वन टू वन चर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय घरे विकत घ्ोणाऱ्या ग्राहकांना वित्तीय सहाय्य अथवा कर्जाशी संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी काही वित्तीय संस्था, बँका यांचा देखील या प्रदर्शनात सहभाग असणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘बीएएनएम'चे अध्यक्ष हरीश छेडा, प्रमुख मार्गदर्शक भुपेन शहा, देवांग त्रिवेदी, खजिनदार जयंत पारीख, संयोजक मनिष शहा, रसिक चौहान, विनोद त्रिवेदी यांच्यासह इतर सदस्य बिल्डर उपस्थित होते. सरकारने निवासी प्रकल्पांवरील जीएसटी १ टक्क्याने कमी करत रिअल इस्टेट उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा, असे साकडे क्रेडाईने घातले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in