नवी मुंबई, पनवेलला भूकंपाचा सौम्य धक्का

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नवी मुंबई आणि पनवेलला भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले
नवी मुंबई, पनवेलला भूकंपाचा सौम्य धक्का

नवी मुंबई : नवी मुंबई आणि पनवेलमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्चर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाच्या धक्क्याने नवी मुंबई आणि पनवेल येथील इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, यामध्ये कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही.

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नवी मुंबई आणि पनवेलला भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नेमके काय झाले? हे समजून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काही तास लागले. भूगर्भातून येणारा काही सेकंदांचा आवाज आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पनवेल व नवी मुंबई खाडीलगतच्या इमारतींमधील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.

वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ०९.५४ च्या सुमारास नवी मुंबई आणि पनवेलजवळ १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्चर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळी भूकंपाच्या हादऱ्याने अनेकांच्या घरातील वस्तू काही सेकंदांसाठी हलल्यासारख्या झाल्या. मोठा आवाज झाल्याचे कामोठे येथील नागरिकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in