मनसेचे आता ठरले, लढायचे आणि जिंकायचे

लोकसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची हे जाहीर केल्याने आम्ही लोकसभा निवडणुकीचे रिंगणात उतरणार आहोत.
मनसेचे आता ठरले, लढायचे आणि जिंकायचे

कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेचे प्रेम मिळत आहे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वांना आपले वाटतात. त्यामुळे मनसेने आता ठरवले आहे. लोकसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची हे जाहीर केल्याने आम्ही लोकसभा निवडणुकीचे रिंगणात उतरणार आहोत. मनसेने आता लढायचे आणि जिंकायचे हा मंत्र स्वीकारला असून, सगळीकडे चाललेली पळवापळवी याला जनता कंटाळली असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वोत्तम पर्याय आहे. असे स्पष्ट प्रतिपादन मनसेचे नेते, राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन दिवसीय सहकार शिबिराचा समारोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर, सरचिटणीस रिटा गुप्ता, ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे, सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान सेल अध्यक्ष संतोष नागरगोजे, सहकार सेलचे पदाधिकारी सरचिटणीस विजय जाधव, अनिता माझगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, महिला उपाध्यक्ष प्रियांका शृंगारे, मुंनर पवार, बाळासाहेब शिंदे, संजय अराडकर, महेश फरकले, अनिल व्यास, मुंबई उपाध्यक्ष वैभव भोर, प्रकाश मिस्त्री, संजय घावरे, रावसाहेब शिंदे, सागर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, तुमचे पक्षाचे आणि पक्षावर किती प्रेम करावे तसे प्रेम दिसून आले असे जाहीर कौतुक केले. मी तर तुमचा दादा आहे आणि त्यामुळे माझ्या घराचे, माझ्या मनाचे आणि माझ्या पक्षाच्या अध्यक्षांचे दार देखील तुमच्यासाठी सताड उघडे आहे. ज्या प्रमाणे दिवा जळतो दुसऱ्यांना प्रकाश देतो तसा तो स्वतः जळत नाही. तसे त्यांना एकमेकांवर जळू द्यावे. आपल्याला लढायचे आहे आणि जिंकण्यासाठी लढण्यासाठी आहे. मुंबईमध्ये आम्ही सर्व जण लोकसभा निवडणुक लढणार आहोत, असे जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in