नवी मुंबई : ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पत्राच्या माध्यमातून खरमरीत टीका केली आहे.
गजानन काळे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी वाशी येथील पोस्ट ऑफिसमधून शेकडो पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवली आहेत. या पत्रात कधीही भूमिका न बदलल्या बद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यासाठी ‘मनसे'तर्फे वेळ मागण्यात आला आहे. तसेच निवडणुकीच्या व्यस्त कामात वेळ न दिल्यास आपल्या फोटोला दुधाने अभिषेक घालणार असल्याचा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी कधी भाजप सोबत युती केली तर कधी तोडली. याला यूटर्न, तडजोड, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे म्हणता येणार नाही. त्यामुळे तुमचे महाराष्ट्रवर असलेले ऋण फेडण्यासाठी आपला दुधाने अभिषेक करू इच्छित असल्याचे गजानन काळे यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.