ईशान्‍य फाऊंडेशनकडून तळोजा येथे मोबाईल क्लिनिक; आरोग्‍यसेवा पुरविण्यासाठी आसपास असलेल्‍या ४१ गावांमध्‍ये प्रवास करणार

विविध मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत ईशान्‍य फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक विश्‍वस्‍त पारूल मेहता यांच्‍या हस्‍ते मोबाइल क्लिनिक आणि सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटरचे उद्घाटन करण्‍यात आले.
ईशान्‍य फाऊंडेशनकडून तळोजा येथे मोबाईल क्लिनिक; आरोग्‍यसेवा पुरविण्यासाठी आसपास असलेल्‍या ४१ गावांमध्‍ये प्रवास करणार

पनवेल : ईशान्‍य फाऊंडेशन या दीपक फर्टिलायजर्स आणि पेट्रोकेमिकल्‍स कॉर्पोरेशन लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने मंगळवारी पनवेल तालुक्यातील तळोजा येथे मोबाइल क्लिनिक सुरू केले. स्‍थानिक समुदायांना घरपोच किफायतशीर व दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. प्रमाणित व पूर्णपणे सुसज्‍ज वैद्यकीय टीम असलेले मोबाइल क्लिनिक तळोजाच्‍या आसपास असलेल्‍या ४१ गावांमध्‍ये प्रवास करणार असून, त्या अनुषंगाने हजारो लाभार्थींपर्यंत पोहोचत त्‍यांना प्रतिबंधात्मक व उपचारात्‍मक आरोग्‍यसेवा मिळणार आहे.

तसेच फाऊंडेशनने देवीचापाडा येथे एनडीसी पॅथोलॉजी डायग्‍नोस्टिक प्रायव्‍हेट लिमिटेडसोबत सहयोगाने 'ईशान्‍य पॅथोलॉजी सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटर' देखील लाँच केले आहे. ते स्‍थानिक समुदायाला किफायतशीर पॅथोलॉजी सेवा देणार आहे. या उपक्रमामुळे चाचण्‍यांचा खर्च ८० ते ९० टक्‍क्‍यांनी कमी होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे आर्थिकदृष्‍ट्या वंचित रुग्‍णांना मोठा दिलासा मिळेल.

विविध मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत ईशान्‍य फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक विश्‍वस्‍त पारूल मेहता यांच्‍या हस्‍ते मोबाइल क्लिनिक आणि सॅम्‍पल कलेक्‍शन सेंटरचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी एमआयडीसी पनवेल विभागीय कार्यालयाचे संतोष थिटे, उपजिल्हाधिकारी डॉ. विक्रांत भालेराव, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश काळदाते आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in