कामासाठी तगादा लावणाऱ्या आईची मुलाकडून हत्या

रागाच्या भरात रूपचांदने घरातील गमशाच्या सहाय्याने गळा आवळून आईची हत्या केली.
कामासाठी तगादा लावणाऱ्या आईची मुलाकडून हत्या

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरी गावात मुलाने आईची रुमालाने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संशयिताला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. काही तरी कामधंदा कर म्हणून आई सतत तगादा लावत होती, त्या रागातून मुलाने आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.

कोपरी गावातील गावदेवी मंदिराजवळील सागर भोईर इमारतीत संशयीत रूपचांद रहेमान शेख हा आईसोबत राहतो. रूपचांद हा कुठलाही कामधंदा करत नसल्यामुळे आई सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख यांच्यात कायम वादावादी होत होती. शनिवारी रात्री अशीच वादावादी सुरू असताना रागाच्या भरात रूपचांदने घरातील गमशाच्या सहाय्याने गळा आवळून आईची हत्या केली.

याबाबत माहिती मिळताच जवळच्याच इमारतीत राहणारी आरोपीची बहिण घरी आली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in