पालिका आयुक्तांचे विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड, शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर व शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
पालिका आयुक्तांचे विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर आयुक्त तथा प्रशासक यांनी मनपा शाळा क्रमांक ४, काशी येथे २४ जानेवारी रोजी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन केले. यावेळी आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड, शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर व शालेय मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मनपाच्या एकूण ३६ शाळा आहेत. या सर्व या शाळेत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बॅग व शैक्षणिक साहित्य पुरवठा करते. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मनपा शाळेत एकूण ७५ डिजिटल वर्ग असून सर्व शाळेत विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. या सुविधांबरोबर शालेय आहार ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बाब असून याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होता कामा नये यासाठी आयुक्त यांच्या निर्देशानुसार स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत समाधान

महापालिकेच्या ३६ शाळांमध्ये आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना 'मिड डे मिल' मध्ये मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासणी, त्याची चव, दर्जा व त्या आहाराबाबत विद्यार्थ्यांचा अभिप्राय याची नोंद घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना दिली होती. 'मिड डे मिल' मध्ये मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगत आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर व प्रमुख अधिकारी वर्ग यांनी समाधान व्यक्त केले व यापुढेही याच प्रकारचा उत्तम आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा, असे निर्देश पालिका आयुक्त यांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in