'त्या' खासदारांचा टांगा पलटी करणार; शिवसेने नेते नरेश म्हस्के यांचा इशारा

शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर साधला निशाणा
'त्या' खासदारांचा टांगा पलटी करणार; शिवसेने नेते नरेश म्हस्के यांचा इशारा

"२००९च्या ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय चौगुले उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी ठाण्यातील चरईमध्ये कार्यालयातून षडयंत्र रचण्यात आले," असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. "म्हणून त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजन विचारे यांचा टांगा पलटी करणार," असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथे झालेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी नरेश म्हस्के म्हणाले की, "यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, त्यांच्या भोवतीचे कोंडाळे म्हणजे चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आपल्यातीलच एक शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. एकनाथ शिंदेची जशी लोकप्रियता वाढू लागली तशी ते मातोश्रीच्या डोळ्यात खूपत होते. त्यांच्याविरोधात काहींनी उध्दव ठाकरेंचे कान भरले. मी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बोलत होतो, तेंव्हा मला स्वतः उध्दव ठाकरेंचा फोन आला होता. एकनाथ शिंदेंच्या बाजूने बोलायची गरज काय? असा प्रश्न त्यांनी मला तेव्हा विचारला होता." असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला." असे त्यांनी यावेळी सांगितले. "राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला काळे फासले आहे. तरीही मातोश्रीवरून आदित्य ठाकरेंचा आव्हाडांना मदत करायची, असा फोन आला." असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in