
नवी मुंबई : तुर्भे येथे राहणारा एक दहावीचा विद्यार्थी हॉल तिकीटचे प्रिंट आऊट आणण्यासाठी गेला असता त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना तुर्भे नाक्यावर घडली आहे. सायकलवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या डम्परने त्याला जोरदार धडक दिली त्यातच त्याचा जीव गेला. याप्रकरणी डम्परचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तुर्भे येथे राहणारा दीपांशु राजेश बौद्ध हा दहावीत शिकत असून काही दिवसांपूर्वी हॉल तिकीट वितरीत करण्यात आले. त्याच हॉल तिकीटची अजून एक झेरॉक्स प्रिंट काढण्यासाठी दीपांशु हा मित्र अल्ताफसोबत रस्त्यावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या डम्परने त्याला जोरदार धडक दिली.