नवी मुंबई
नवी मुंबई : ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७३ वर्षीय नराधमाला अटक
रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील नराधम वृद्ध व्यक्तीविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका ७३ वर्षीय वृद्धाने ७ वर्षीय मुलीला आपल्या घरामध्ये नेऊन तिचे तोंड आणि हात बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील नराधम वृद्ध व्यक्तीविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील ७३ वर्षीय आरोपी हा रबाळे एमआयडीसी परिसरात राहण्यास असून ७ वर्षीय पीडित मुलगी त्याच परिसरात राहण्यास आहे.
१४ सप्टेंबर रोजी दुपारी आरोपी वृद्धाने पीडित मुलीला आपल्या घरामध्ये बोलवून तिचे तोंड रुमालाने व हात दोरीने बांधून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर पीडित मुलीच्या आईने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.