नवी मुंबई : घरात घुसून गणपती मूर्तीच्या गळ्यातील २.५ लाख रुपयांचा हार चोरीला, जुईनगरमधील घटना

गणपती बाप्पा म्हणजे केवळ आराध्य दैवत नव्हे तर आवडता बाप्पा म्हणून भक्त त्याच्याकडे पाहतात. गणपती घरी आल्यावर त्याच्यासाठी काय करू काय नाही अशी अवस्था भक्तांची होते.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : गणपती उत्सव सध्या सर्वत्र उत्साहात सुरु आहे. मात्र नेरुळ मधील एका घरात प्रवेश करीत गपपत्ती मूर्तीला घातलेला सोन्याचा हार अनोळखी चोराने चोरी केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणपती बाप्पा म्हणजे केवळ आराध्य दैवत नव्हे तर आवडता बाप्पा म्हणून भक्त त्याच्याकडे पाहतात. गणपती घरी आल्यावर त्याच्यासाठी काय करू काय नाही अशी अवस्था भक्तांची होते. त्यात आरास , विद्युत रोषणाई त्याच्या आवडते मोदक तर हमखास असतात. शिवाय सकाळ संध्याकाळ आसपाच्या शेजाऱ्यांना बोलावून उत्साहात आरतीही केली जाते. नेरुळ सेक्टर २३ गावदेवी चौक जुईनगर येथे राहणारे सूर्यकांत वाडकर यांनी तर घरातील २ लाख ३४ हजार रुपयांचा सोन्याचा हार गणपती मूर्तीला घातला. सोबत फुलांचा हारही होताच.

१२ तारखेला गणपती मूर्तीच्या गळ्यात सोन्याचा हार नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात शोधाशोध केली पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी ११ तारखेला सकाळी ११ च्या सुमारास शेवटचा हार गणपती मूर्तीच्या गळ्यात पहिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हार नसल्याचे लक्षात आले. याच दरम्यान हार चोरी झाला अशी त्यांची खात्री पटली . त्यामुळे सदर घटनेबाबत नेरुळ पोलिसांकडे त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

logo
marathi.freepressjournal.in