नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा १७ सप्टेंबरचा मुहूर्त? पंतप्रधानांच्या वाढदिवशीच विमानोड्डाणाला सुरुवात होणार?

नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त येत्या सप्टेंबर महिन्यातला काढला जाणार असल्याचे विमानतळ उभारणाऱ्या अदानी समूहाकडून राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीला सांगण्यात आले. त्यामुळे येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाणाला सुरुवात करण्याचा मानस राज्य सरकार व अदानी समूहाचा दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा १७ सप्टेंबरचा मुहूर्त? पंतप्रधानांच्या वाढदिवशीच विमानोड्डाणाला सुरुवात होणार?
Published on

नवी मुंबई: नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त येत्या सप्टेंबर महिन्यातला काढला जाणार असल्याचे विमानतळ उभारणाऱ्या अदानी समूहाकडून राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीला सांगण्यात आले. त्यामुळे येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानोड्डाणाला सुरुवात करण्याचा मानस राज्य सरकार व अदानी समूहाचा दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई राज्यातील विमानतळ प्रकल्पाच्या कामाच्या सार्वजनिक आढावा बैठकीसाठी बुधवारी विमानतळ साईटवर आलेल्या राज्यातील आमदारांच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या (पीयूसी) शिष्टमंडळासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करताना नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त आता येत्या सप्टेंबर महिन्यातला ठरवला जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठी व या देशासाठी निर्माण होणार आहे. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक सिडको

आता प्रतीक्षा सप्टेंबरची
यापूर्वी मे व जून २०२५ मध्ये नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्याचा मुहूर्त काढण्यात आला होता. परंतु, विमानतळ टर्मिनलचे काम पूर्ण न झाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र टर्मिनलचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी किमान १५ सप्टेंबर उजाडणार असल्याचे अदानी समूहातर्फे सार्वजनिक उपक्रम समितीच्या आढावा बैठकीत सांगण्यात आले. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने विमानतळ उद्घाटनाचा मुहर्त या तारखेच्या आसपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
logo
marathi.freepressjournal.in