नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा तिढा कायम

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा तिढा कायम आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा तिढा कायम आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. न्यायालयाला सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित मंत्रालयाला देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

विमानतळाच्या नावावरून भविष्यात मुंबई, नवी मुंबई परिसरात अशांतता पसरू नये यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी करत प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर आज मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना, विमानतळाच्या नामांतराचा वाद अनेक वर्षे सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in