नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनाला तीव्र वळण; रश्मिता पोपेटासह ३०० आंदोलकांवर गुन्हे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी तीव्र वळण लागले. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्या रश्मिता राम पोपेटा यांच्यासह सुमारे २०० ते ३०० पुरुष व महिला कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनाला तीव्र वळण; रश्मिता पोपेटासह ३०० आंदोलकांवर गुन्हे
Published on

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी तीव्र वळण लागले. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्या रश्मिता राम पोपेटा यांच्यासह सुमारे २०० ते ३०० पुरुष व महिला कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिबाप्रेमी नामकरण समितीच्या वतीने रश्मिता पोपेटा यांनी चिंचपाडा येथे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पाच दिवसांचे आमरण उपोषण सुरू केले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाही त्यांनी उपोषण कायम ठेवले.

बुधवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हजारो प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, महिला, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पनवेल येथे एकत्र आले. सकाळी सुमारे ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विधानभवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी मोर्चा विनापरवाना व बेकायदेशीर असल्याचे सांगत आंदोलकांना पांगण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलकांनी चौकात ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही आंदोलक आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी रश्मिता राम पोपेटा, आदित्य पोपेटा, अवंतिका पोपेटा, कांतीलाल कडू आणि अन्य आंदोलकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी आरोपांखाली भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in