बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायीक गुरुनाथ चिंचकर यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायीक गुरुनाथ चिंचकर यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चिंचकर यांची दोन्ही मुले अमली पदार्थ तस्करीत असल्याचे उघडकीस आल्यामुळे चिंचकर यांना पोलिसांकडून सतत चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. त्यामुळे हा त्रास सहन न झाल्याने चिंचकर यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. चिंचकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी त्याबाबत स्पष्ट उल्लेख केला आहे.

गुरुनाथ चिंचकर हे एनआरआय पोलीस स्टेशनच्या पाठीमागील गुरुकिरण सोससायटीत राहण्यास होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास तळमजल्यावर आले होते. त्यानंतर ते त्यांच्या कार्यालयात बसले असताना त्यांनी स्वत:च्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांच्या पुतण्याने एनआरआय पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

एनआरआय पोलिसांनी या घटनेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in