Navi Mumbai : पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज! १ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सिडको प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे.
Navi Mumbai : पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज! १ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित
Navi Mumbai : पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज! १ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सिडको प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सिडको कार्यक्षेत्रात २४x७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विविध नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या धर्तीवर २०१८ पासून सुरू असलेली ही व्यवस्था यंदा अधिक सक्षम करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला.

सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. या बैठकीस मुख्य अभियंता प्रभाकर फुलारी, शीला करुणाकरण, जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, सुरक्षा अधिकारी के. ए. गायकवाड तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सिडकोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बचावकार्यासाठी बोटींचीही व्यवस्था

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियंत्रण कक्षात व्हॉट्सॲप ग्रुप, सीसीटीव्ही प्रणाली आणि वॉकीटॉकीद्वारे तत्काळ संपर्काची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचू नये म्हणून हायपॉवर पंप तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गांमध्ये पाणी साचण्यापासून बचाव करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी रुग्णवाहिका आणि खाटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालयांशी समन्वय साधण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे मनुष्यबळ, अत्याधुनिक उपकरणे आणि वाहने सज्ज ठेवण्यात आली असून, गरज भासल्यास बचावकार्यासाठी बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शॉर्टसर्किटच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महावितरणशी समन्वय राखण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in