

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ९५६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले आहेत. आता पालिकेकडे प्राप्त झालेल्या या अर्जांची छाननी बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
दिघा ते बेलापूर विभागातील आठ प्रभागांमध्ये उमेदवारांनी अर्ज भरले असून सर्वाधिक अर्ज नेरूळ विभागातून दाखल झाले आहेत, तर सर्वात कमी अर्ज दिघा विभागातून आले आहेत. दिघा विभागात एकूण ८६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
उमेदवारांची विभागनिहाय दखल
बेलापूर: १३६, नेरूळ: १६२, वाशी: १०२, तुर्भे: १४५, कोपरखैरणे: १२३, घणसोली: ११३, ऐरोली: ८९, दिघा: ८६