Navi Mumbai : हाऊस रेस्टॉरंटला ऑर्केस्ट्रा परवाना देण्याचा कोर्टाचा आदेश

सानपाडा येथील 'द अफेअर हाऊस रेस्टॉरंट अँड बार'साठी ऑर्केस्ट्रा परवाना नाकारल्यामुळे नवी मुंबई पोलीस प्रशासनाला महागात पडले आहे.
Navi Mumbai : हाऊस रेस्टॉरंटला ऑर्केस्ट्रा परवाना देण्याचा कोर्टाचा आदेश
Navi Mumbai : हाऊस रेस्टॉरंटला ऑर्केस्ट्रा परवाना देण्याचा कोर्टाचा आदेश(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी मुंबई : सानपाडा येथील 'द अफेअर हाऊस रेस्टॉरंट अँड बार'साठी ऑर्केस्ट्रा परवाना नाकारल्यामुळे नवी मुंबई पोलीस प्रशासनाला महागात पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि कोकण विभागीय आयुक्तांचा आदेश रद्द करत याचिकाकर्त्याला चार आठवड्यांत परवाना देण्याचे निर्देश दिले आहेत.

हा प्रकरण शिवाजी सांबु वाघराळकर यांनी सुरू केले. त्यांनी लाइव्ह ऑर्केस्ट्रा परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र स्थानिक २३ गृहनिर्माण संस्था, २३२ नागरिक आणि काही व्यापारी संघटनांनी विरोध नोंदवला होता. पोलीस आयुक्तांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परवाना नाकारला आणि कोकण विभागीय आयुक्तांनी अपील फेटाळली. उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासन आणि अपील प्राधिकरणाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी न देता थेट आदेश काढणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाविरुद्ध आहे. तसेच, परिसरात इतर बारना संगीताची परवानगी असताना केवळ एका बारला परवाना नाकारणे हे भेदभावाचे स्वरूपाचे आहे. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांचा परवाना नाकारण्याचा आदेश आणि कोकण विभागीय आयुक्तांचा निकाल रद्द करत, चार आठवड्यांच्या आत ऑर्केस्ट्रा परवाना बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in