नवी मुंबईत चिमुरड्यासोबत दुष्कृत्य; पालकांचा शाळेवर आक्रोश मोर्चा

नवी मुंबईतील सीवूड्स येथील डीपीएस (DPS) शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली.
नवी मुंबईत चिमुरड्यासोबत दुष्कृत्य; पालकांचा शाळेवर आक्रोश मोर्चा
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स येथील डीपीएस (DPS) शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत बसचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी सकाळी पालकांनी शाळेवर धडक देत आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोर्च्यात पालक वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते. या मोर्च्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग दाखवत निषेध नोंदवला. यावेळी निषेध असो, निषेध असो, शाळा प्रशासनाचा निषेध असो, सहआरोपी करा, सहआरोपी करा, शाळेच्या मुख्याध्यापकांना सहआरोपी करा, अटक करा, अटक करा, शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करा, निलंबन करा, निलंबन करा, शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करा अशा घोषणा पालक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांचे गैरवर्तनाबाबत पालकांनी माध्यमांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. हातावर काळया फिती लावून पालक व मनसे पदाधिकारी यांच्याकडून निषेध नोंदविण्यात आला.

मात्र, या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणारे शाळेचे मुख्याध्यापक हे सुद्धा तेवढेच जबाबदार असून त्यांना सहआरोपी करत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालकांनी यावेळी करण्यात आली.

यावेळी पालकांसोबत मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, मनसे शहर सचिव सचिन कदम, महिला सेना उपशहर अध्यक्षा दीपाली ढऊळ उपस्थित होते.

मुख्याध्यापकांची वादग्रस्त पार्श्वभूमी

मुख्याध्यापक हरीशंकर वशिष्ठ यांच्यावर काही वरिष्ठ शिक्षकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच हे मुख्याध्यापक उत्तर प्रदेश मधील बुलंद शहर येथील शाळेत असताना त्यांच्यावर शिक्षक व महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले होत. अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला मुख्याध्यापक म्हणून का नेमले असा प्रश्न ही बऱ्याच पालकांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in