नवी मुंबई : शाळेत वाद झाला, शाळा सुटल्यावर हाणामारी झाली; अल्पवयीन मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू

नवी मुंबई : शाळेत वाद झाला, शाळा सुटल्यावर हाणामारी झाली; अल्पवयीन मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू

नवी मुंबईतील तुर्भे गावातील सामंत विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत वाद झाला. शाळा सुटल्यावर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि...

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे गावातील सामंत विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या वेळेत वाद झाला. शाळा सुटल्यावर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य एक गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात ते आठ विद्यार्थी ताब्यात घेतले आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे आदित्य भोसले असे नाव आहे, तर देवांग ठाकूर हा जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघेही सामंत विद्यालयात १२ वीला शिकत आहेत. भोसले आणि त्याच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांचे वाद सुरू होते. हा वाद काही वेळापुरता शमवण्यात आला; मात्र बुधवारी शाळा सुटल्यावर १२च्या सुमारास नजीकच्या मैदानात हा वाद पुन्हा उफाळून आल्याने आपापसात जोरदार भांडण आणि त्यानंतर हाणामारी झाली. ही हाणामारी एवढी भीषण होती की, त्यात आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर हे गंभीर जखमी झाले. जखमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना भोसले याला मृत घोषित केले; तर ठाकूर याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. घटना घडल्यावर एपीएमसी पोलीस व गुन्हे शाखा कक्ष १ने घटनास्थळी धाव घेतली असून, पाच ते सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास हा एपीएमसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा कक्ष एक समांतर रित्या करत आहेत. अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in