नवी मुंबईची हरित प्रवासाची दमदार सुरुवात; नेरूळमध्ये पहिले सार्वजनिक ई-व्ही चार्जिंग स्टेशन सुरू

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहभागातून नेरुळ येथील सीवूड मॉलजवळील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात नवीन ई-व्ही चार्जिंग स्टेशन जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले असून, ही सुविधा २४x७ नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
नवी मुंबईची हरित प्रवासाची दमदार सुरुवात; नेरूळमध्ये पहिले सार्वजनिक ई-व्ही चार्जिंग स्टेशन सुरू
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहभागातून नेरुळ येथील सीवूड मॉलजवळील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात नवीन ई-व्ही चार्जिंग स्टेशन जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले असून, ही सुविधा २४x७ नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे.

नवी मुंबईकरांसाठी ही सेवा पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. इलेक्ट्रीक वाहनधारकांसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सहज, सुरक्षित व परवडणारी चार्जिंग सुविधा मिळावी, यासाठी या चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नवी मुंबईला हरित आणि प्रदूषणमुक्त शहर बनविण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे.

नवी मुंबईतील या पहिल्या सार्वजनिक ई-व्ही चार्जिंग स्टेशनमुळे शहरात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढेल आणि पर्यावरण रक्षणास चालना मिळेल. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने सर्व इलेक्ट्रीक वाहनधारकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. - डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका

मोबाइल ॲपद्वारे आगाऊ बुकिंगची सुविधा

या चार्जिंग स्टेशनमध्ये दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र चार्जिंगची व्यवस्था असून, दोन गन फास्टर चार्जर (CCS2 – ३०kW) उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांना मोबाइल ॲपद्वारे आगाऊ बुकिंगची सुविधा दिली जाणार आहे. प्रशस्त व सुरक्षित पार्किंग, आधुनिक आग प्रतिबंधक उपाययोजना, विश्रांतीसाठी शांत परिसर व खेळाचे मैदान यासारख्या सुविधा देखील येथे उपलब्ध आहेत. याशिवाय परवडणारे दर आणि सोयीस्कर वापरामुळे नागरिकांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in