Navi Mumbai : घणसोली स्थानकात पंख्यासह लोखंडी फ्रेम कोसळली; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकात निकृष्ट दर्जाच्या कामाचे गंभीर चित्र समोर आले आहे. स्थानकातील भिंतीलगत बसवलेले वायरयुक्त पंखे आणि लोखंडी फ्रेम अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घणसोली स्थानकात पंख्यासह लोखंडी फ्रेम कोसळली
घणसोली स्थानकात पंख्यासह लोखंडी फ्रेम कोसळली
Published on

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकात निकृष्ट दर्जाच्या कामाचे गंभीर चित्र समोर आले आहे. स्थानकातील भिंतीलगत बसवलेले वायरयुक्त पंखे आणि लोखंडी फ्रेम अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली. दिवसाढवळ्या लोखंडी फळ्या आणि उपकरणे कोसळत असतील तर प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास असलेल्या या स्थानकात अशा प्रकारची घटना घडणे हे देखभाल आणि कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते सचिन कटारे यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून संपूर्ण परिसरातील कामांचे त्वरित तांत्रिक परीक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तत्काळ ईमेलद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देत दुरुस्तीची तातडीची गरज अधोरेखित केली.

कटारे यांनी स्पष्ट इशारा दिला की, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा अशी घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल. तसेच स्थानकाची रचना, फॅन इन्स्टॉलेशन, लोखंडी फिक्स्चर्स यांचे पुनर्परीक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in