Navi Mumbai : प्रियकराने फोनवर ब्लॉक केल्याने तरुणीची खाडीत उडी; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

प्रियकराने अचानक फोनवर ब्लॉक केल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणीने वाशी खाडी पुलावर उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र, वाशी खाडीतील मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणीला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सदर तरुणी बचावली आहे.
Navi Mumbai : प्रियकराने फोनवर ब्लॉक केल्याने तरुणीची खाडीत उडी; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
Navi Mumbai : प्रियकराने फोनवर ब्लॉक केल्याने तरुणीची खाडीत उडी; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
Published on

नवी मुंबई : प्रियकराने अचानक फोनवर ब्लॉक केल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणीने वाशी खाडी पुलावर उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र, वाशी खाडीतील मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणीला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सदर तरुणी बचावली आहे. पोलिसांनी या तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

या घटनेत बचावलेली तरुणी ही चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहते. या तरुणीच्या प्रियकराने कोणतेही कारण नसताना अचानक तिला ब्लॉक केले होते. त्याचप्रमाणे घरच्यांकडुन तिच्यावर लग्नासाठी दबाव आणण्यात येत होता. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या या तरुणीने मंगळवारी सकाळी चेंबुर येथून पनवेल लोकल पकडली. वाशी खाडी पुलावर लोकलचा वेग कमी असताना, तिने लोकलमधून थेट वाशी खाडी पुलावरुन पाण्यात उडी मारली. यावेळी सदर तरुणी खाडी पुलाच्या कठडयाला धडकून पाण्यात पडली.

नशिबाने तिच्या खांद्यावर सॅक असल्याने ती काही वेळ पाण्यावर तरंगू शकली. त्याच वेळी खाडीत मासेमारी करत असलेले वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार, रोशन भोईर आणि अजय भोईर यांनी तिला पाण्यात पडताना पाहिले. कोणतीही विलंब न लावता या मच्छीमारांनी आपल्या बोटीने तिथे धाव घेत तरुणीला सुखरुप बाहेर काढले.

यावेळी लोकलमधील प्रवाशांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

logo
marathi.freepressjournal.in