प्रेयसीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू

नरेंद्र जाधव (२७) असे या तरुणाचे नाव आहे. एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
प्रेयसीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू

नवी मुंबई : पावणे गावात राहणाऱ्या तरुणाने एका महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबतचे अश्लिल व आक्षेपार्ह व्हिडीओ मित्राच्या माध्यमातून व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नरेंद्र जाधव (२७) असे या तरुणाचे नाव आहे. एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील २४ वर्षीय महिला कुटुंबासह वाशी परिसरात राहण्यास असून, तिचा पतीसोबत घटस्फोट झाला आहे.

सदर महिला व तिची बहीण या दोघीही बारमध्ये वेटर म्हणून काम करतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर महिला वाशीतील एका बारमध्ये काम करत असताना, तिची ओळख पावणे गावात राहणाऱ्या नरेंद्रसोबत झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर नरेंद्रने या महिलेसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे देखील सुरू झाले होते. या दोघांच्या घरच्यांना देखील त्यांचे लग्न मान्य होते. गत फेब्रुवारी महिन्यात महिलेच्या घरी कुणीही नसताना नरेंद्र तिच्या घरी गेला होता. त्यावेळी या दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबध झाले होते. त्यावेळी नरेंद्रने त्याच्या मोबाईलवर या महिलेसोबतचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. सदरचा व्हिडीओ कुणालाही पाठवू नये असे या महिलेने नरेंद्रला त्यावेळी बजावले होते; मात्र त्यानंतर देखील नरेंद्र याने या दोघांच्या शरीरसंबंधाचा व्हिडीओ नवा पवार याला पाठवला होता. त्यानंतर नवा पवारने सदरचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर सदर महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे तिने नरेंद्रकडे त्याबाबत विचारणा केली असता, त्याने उलट या महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर या महिलेने एपीएमसी पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in