नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईने पुन्हा एकदा देशपातळीवर आपला दबदबा सिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक
नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक
Published on: 

नवी मुंबई : स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईने पुन्हा एकदा देशपातळीवर आपला दबदबा सिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथे आयोजित दहाव्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबईला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाआहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 'स्वच्छतेची नवी पहल - बढायें हाथ, करें सफाई साथ' या संकल्पनेतून दहावे स्वच्छ सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. या सर्वेक्षणात देशभरातील शहरांच्या स्वच्छता व्यवस्थापन, कचरा संकलन व विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग अशा विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये नवी मुंबईने अव्वल स्थान मिळवत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान पटकावला.

सतत दहा वर्षे स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी

दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. विशेष म्हणजे, नवी मुंबईने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध वर्षांत वेगवेगळ्या गटांत पुरस्कार मिळवणाऱ्या नवी मुंबईने यंदा देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक मिळवत आपल्या यशस्वी वाटचालीवर शिक्कामोर्तब केले आहे.

सामूहिक प्रयत्नांचे यश

महापालिकेची स्वच्छता यंत्रणा, सफाई कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि स्वच्छतामोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे. देशपातळीवर मिळालेल्या या सर्वोच्च सन्मानामुळे नवी मुंबईच्या स्वच्छ आणि सुंदर शहराच्या ओळखीला अधिक बळ मिळाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)