Navi Mumbai : एनएमआयएवर एका दिवसात विक्रमी प्रवास! २१२ विमानांची ये-जा; २७ हजार प्रवाशांची नोंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) विमानसेवा सुरू झाल्यापासूनचा आतापर्यंतचा सर्वाधिक व्यस्त दिवस नोंदवला आहे. १९ नोव्हेंबर रोजी विमानतळावर तब्बल २१२ विमानांची ये-जा झाली, तर २७ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.
Navi Mumbai : एनएमआयएवर एका दिवसात विक्रमी प्रवास! २१२ विमानांची ये-जा; २७ हजार प्रवाशांची नोंद
Navi Mumbai : एनएमआयएवर एका दिवसात विक्रमी प्रवास! २१२ विमानांची ये-जा; २७ हजार प्रवाशांची नोंद
Published on: 

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) विमानसेवा सुरू झाल्यापासूनचा आतापर्यंतचा सर्वाधिक व्यस्त दिवस नोंदवला आहे. १९ नोव्हेंबर रोजी विमानतळावर तब्बल २१२ विमानांची ये-जा झाली, तर २७ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. प्रवासी विमानसेवेसह कार्गो आणि जनरल एव्हिएशनच्या वाढत्या वाहतुकीचे एकाच दिवशी यशस्वी व्यवस्थापन करून विमानतळाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

या दिवशी एकूण १७३ नियोजित प्रवासी विमानांच्या हालचाली झाल्या. त्यामध्ये ८७ विमानांचे आगमन, तर ८६ विमानांचे प्रस्थान झाले. याशिवाय २० कार्गो विमानांची ये-जा आणि जनरल एव्हिएशनच्या १९ विमानांच्या हालचालींची नोंद झाली. अशा प्रकारे दिवसभरात एकूण २१२ विमानांचे व्यवस्थापन करण्यात आले. प्रवासी विमान वाहतुकीमध्ये इंडिगोने सर्वाधिक १२२ विमानांच्या हालचालींसह आघाडी घेतली. त्यापाठोपाठ अकासा एअरच्या ३५, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या १० आणि फ्लाय ९१ च्या सहा विमानांच्या हालचाली झाल्या. याशिवाय नॉन-शेड्युल्ड आणि कार्गो विमानांच्या एकूण ३९ हालचालींची नोंद झाली.

एका दिवसात २१२ विमानांची ये-जा आणि २७ हजारांहून अधिक प्रवाशांचे व्यवस्थापन करणे ही विमानतळाच्या पायाभूत सुविधा, कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतेची पावती असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विमानतळाचे विविध विभाग, नियामक यंत्रणा, विमान कंपन्या आणि अन्य संबंधित घटकांमधील समन्वयामुळे ही कामगिरी शक्य झाली.

१९ नोव्हेंबर सर्वाधिक व्यस्त दिवस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशांतर्गत विमानसेवेचा विस्तार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनेही तयारी करत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाढती विमान वाहतुकीची गरज लक्षात घेता या विमानतळाचे महत्त्व वाढत आहे. १९ नोव्हेंबरची विक्रमी वाहतूक ही भविष्यातील वाढत्या प्रवासी संख्येचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेची महत्त्वपूर्ण चाचणी ठरली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)