नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षअखेरपर्यंत कार्यरत - ज्योतिरादित्य

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षअखेरपर्यंत कार्यरत - ज्योतिरादित्य

नागपूर : नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी मुंबर्इतील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू वर्षअखेरीस कार्यरत होर्इल, अशी घोषणा केली आहे. तसेच पुढील १० ते १५ वर्षात देशातील आणखी दहा शहारांत प्रत्येकी दोन विमानतळ असतील, अशी माहिती देखील दिली आहे. नागपूर येथे मिहान सेझ मधील एएआर-इंडामेर एमआरओ या विमान दुरुस्ती सुविधेच्या अनावरण समारंभात ज्योतिरादित्य सिंधिया बोलत होते.

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले आहे, असेही सिंधिया यांनी यावेळी अधोरेखित केले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान नवी मुंबर्इ आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होर्इल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या विमानतळावर पहिले विमान उतरेल. विमानतळामुळे नवी मुंबर्इचा मोठ्या प्रमाणात विकास होर्इल. तसेच पुढील १० ते १५ वर्षांत देशातील किमान दहा शहरात प्रत्येकी दोन विमानतळ असतील. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबर्इतील विमानतळांची आपण पाहणी करणार आहोत, असेही सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in