आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर; सिडको उपाध्यक्षांनी घेतला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंबंधी विमानतळ माहिती प्रकाशन (एआयपी) प्रकाशित झाल्यापासून व संचालक, नागरी विमान उड्डाण (डीजीसीए) यांच्याकडून विमानतळ अनुज्ञप्तीकरिता देण्याकरिता निरीक्षण सुरू असल्याने विमानतळाचे उद्घाटन व परिचालन करण्याच्या दृष्टिकोनातून एअरसाइड, लॅन्डस्लाइड आणि टर्मिनल इमारत यांचे काम पूर्ण करणे...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर; सिडको उपाध्यक्षांनी घेतला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर; सिडको उपाध्यक्षांनी घेतला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावाshekhran hampras
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंबंधी विमानतळ माहिती प्रकाशन (एआयपी) प्रकाशित झाल्यापासून व संचालक, नागरी विमान उड्डाण (डीजीसीए) यांच्याकडून विमानतळ अनुज्ञप्तीकरिता देण्याकरिता निरीक्षण सुरू असल्याने विमानतळाचे उद्घाटन व परिचालन करण्याच्या दृष्टिकोनातून एअरसाइड, लॅन्डस्लाइड आणि टर्मिनल इमारत यांचे काम पूर्ण करणे, कामे पूर्ण करण्यासंदर्भात येणारी आव्हाने जाणून घेणे व या आव्हानांवर मात करून नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सदर आढावा बैठकीमध्ये भर देण्यात आला. सवलतधारक एनएमआयएएल यांनी प्रकल्पाचे काम नियोजित कालाधीत पूर्ण करण्याकरिता सर्व प्रयत्न सुरू आहेत.

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, यांनी गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेतली. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक, शान्तनु गोयल आणि मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई, हे उपस्थित होते. विजय सिंघल यांनी जीत अदानी, संचालक-एअरपोर्ट, अदानी समूह यांच्यासमवेत अदानी समूह संचालक मलय महादेवया, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीव्हीजी के शर्मा, यांच्या उपस्थितीत प्रकल्पाच्या परिचालन सुसज्जतेचे परीक्षण करण्याकरिता आढावा बैठक घेतली.

प्रतिवर्ष २० दशलक्ष प्रवासी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रतिवर्ष ९० दशलक्ष प्रवासी व ३.२ दशलक्ष टन मालवाहतुकीकरिता नियोजित असून लवकरच सुरू होणाऱ्या विमानतळाच्या टप्पा-१ ची क्षमता प्रतिवर्ष २० दशलक्ष प्रवासी व ०.८ दशलक्ष मालवाहतुकीकरिता नियोजित आहे. सध्याच्या टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दोन समांतर टॅक्सी मार्गासह कोड, एफ धावपट्टी, १ टर्मिनल (टी।), कार्गो टर्मिनल आणि इतर अनेक सहाय्यक पायाभूत सुविधा असणार आहेत.

पंधरवड्याला आढावा बैठकीचे आयोजन

विजय सिंघल यांनी विमानतळाकरिता भारतीय महामार्ग प्राधिकरण आणि सिडको यांच्यातर्फे विकसित करण्यात येत असलेल्या रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा देखील आढावा घेतला व विमानतळाचे उद्घाटन होण्यापूर्वी हा प्रकल्प सज्ज करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाच्या प्रगतीचा अत्यंत बारकाईने आढावा घेण्याकरिता विजय सिंघल यांच्याकडून दर पंधरवड्याला नियमितपणे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येते.

logo
marathi.freepressjournal.in