नवी मुंबई : 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'चे उद्घाटन येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत 'सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पंतप्रधान मोदी दुपारी २.४० वाजता विमानाने विमानतळावर आगमन करणार असून, त्यानंतर ते प्रकल्पाचा आढावा घेतील व सभेत मार्गदर्शन करतील, असे सिंघल यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळाचा विकास पाहता ते भारतातील पहिले बहु-मॉडेल विमानतळ ठरेल.
या पत्रकार परिषदेत 'सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांसह अधिकारी उपस्थित होते.
विमानतळाची वैशिष्ट्ये
एकूण क्षेत्रफळ : १,१६० हेक्टर
धावपट्टयाः ३,७०० मीटर लांबीच्या दोन समांतर कोड-४ एफ धावपट्ट्या, दुहेरी समांतर टॅक्सी-वे आणि जलद एक्झिट टॅक्सी-वे जोडलेल्या असणार आहे.
तळावरील सुविधाः २९ कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड, १३ रिमोट कमर्शियल स्टँड, ७ कार्गो स्टँड, ३८ जनरल एव्हिएशन (जीए) स्टँड्स, १५ जीए हँगर्सची सुविधा.
वाहतूक सुविधाः १,५०० कार, २० बस, २० ट्रकसाठी पार्किंग
कनेक्टिव्हिटी
राष्ट्रीय महामार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक नेटवर्कशी अखंड जोडणी
मेट्रो लाईन-८ (सन २०३१ पर्यंत विस्तार)
प्रस्तावित मुंबई-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर,
अटल सेतू, उलवे कोस्टल रोड, ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गांसह जलद कनेक्टिव्हिटी.
आर्थिक व सामाजिक लाभ
दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून पहिल्या टप्प्यात १९,६४७ कोटी रुपये खर्च
संपूर्ण प्रकल्प खर्चः अंदाजे १ लाख कोटी रुपये
बांधकामादरम्यान हजारो रोजगार निर्माण
रायगड, ठाणे, कोकण आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी
पर्यावरण व तंत्रज्ञान
ऑटोमेटेड पीपल मूव्हर (एपीएम) प्रणाली, लँडसाइड एपीएम
४७ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती
ईव्ही बस सेवा
डिजिटल व भौतिक कला प्रतिष्ठान, ड्युटी फ्री शॉपिंग
प्रकल्प व क्षमता
सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत सिडको आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एनएमआयएएल)
मुख्य प्रवर्तक : अदानी विमानतळ होल्डिंग्ज
वार्षिक प्रवासी क्षमता : ९० दशलक्ष
वार्षिक मालवाहतूक क्षमताः ३.२५ दशलक्ष टन
पहिल्या टप्प्यातः २० एमपीपीए प्रवासी, ०.५ दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक