नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे १ जून रोजी उद्घाटन?

आर्थिक राजधानीतील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या १ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडद्वारे व्यवस्थापित होत असलेल्या १७ हजार कोटींच्या या प्रकल्पाबाबत राज्य गुप्तचर विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलला सोमवारीला दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे १ जून रोजी उद्घाटन?
Published on

धैर्य गजरा / मुंबई

आर्थिक राजधानीतील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या १ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडद्वारे व्यवस्थापित होत असलेल्या १७ हजार कोटींच्या या प्रकल्पाबाबत राज्य गुप्तचर विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलला सोमवारीला दिली. तर उद्घाटनानंतरही प्रत्यक्ष उड्डाण सेवा सुरू होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे, असे विमानतळ सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय हवाई दलाच्या सी-२९५ विमान विमानतळावर पहिल्यांदा उतरले होते. डिसेंबरमध्ये इंडिगोच्या ए३२० विमानाने पहिली व्यावसायिक उड्डाण पडताळणी चाचणी घेतली होती.

व्यावसायिक उड्डाण पडताळणी चाचणीच्या यशानंतर १७ एप्रिल रोजी विमानतळाचे उद्घाटन होईल आणि मे महिन्यात उड्डाण सेवा सुरू होईल, असा दावा अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचे समूह मुख्याधिकारी अरुण बंसल यांनी केला होता.

logo
marathi.freepressjournal.in