Navi Mumbai : जेएनपीए बंदरात ८४ लाख ४८ हजार डॉलरची फसवणूक

दुबईस्थित एग्लो कमोडिटीज एफझेडई या कंपनीची ८४ लाख ४८ हजार ५०० अमेरिकन डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navi Mumbai : जेएनपीए बंदरात ८४ लाख ४८ हजार डॉलरची फसवणूक
Navi Mumbai : जेएनपीए बंदरात ८४ लाख ४८ हजार डॉलरची फसवणूकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

उरण : दुबईस्थित एग्लो कमोडिटीज एफझेडई या कंपनीची ८४ लाख ४८ हजार ५०० अमेरिकन डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोझांबिकमधून आयात केलेल्या तुरीच्या डाळीची थकीत रक्कम न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत अंबादास पडवळ हे संबंधित कंपनीचे भारतातील प्रतिनिधी आहेत. अंधेरी येथील नामाह इम्पोर्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक विक्रम पबारी आणि त्यांची पत्नी कृपा पबारी यांनी २०२४ पासून कंपनीकडून तुरीची डाळ खरेदी केली होती. सुरुवातीला नियमित पैसे देऊन त्यांनी कंपनीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर ७ मार्च ते १० मे २०२५ या कालावधीत मोझांबिकमधून २६ हजार २७५ मेट्रिक टन तुरीची डाळ जेएनपीए बंदरात आयात केली. या मालाची एकूण किंमत २ कोटी १० लाख २० हजार डॉलर होती. त्यापैकी १ कोटी २५ लाख ७१ हजार डॉलर अदा करण्यात आले; मात्र उर्वरित ८४ लाख ४८ हजार ५०० डॉलर देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)