नवी मुंबईकरांचा एप्रिलपासून मेट्रो प्रवास?

लवकरच नवी मुंबई शहरातील मेट्रो सेवेचा होणार शुभारंभ
नवी मुंबईकरांचा एप्रिलपासून मेट्रो प्रवास?

नवी मुंबई शहरातील मेट्रो सेवेचा लवकरच शुभारंभ होणार आहे. ही सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व चाचण्या झाल्या असून उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नसल्याने हा प्रकल्प अद्याप सुरु झालेला नाही. मात्र सद्यस्थितीत संबंधित सर्व चाचण्या, इतर बाबी पूर्ण झाल्या असून येत्या एप्रिलपर्यंत ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात पेंधर ते बेलापूर या मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रोचे काम सुरु होते. मात्र विविध अडचणींमुळे हा प्रकल्प अधांतरीतच राहिला. यानंतर सिडकोने महामेट्रोच्या हाती मेट्रोची जबाबदारी देत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचे काम केले. दरम्यान, या सेवेसंबंधित सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र उदघाटनाचा योग्य मुहूर्त सापडला नसल्याने अद्याप नवी मुंबईकरांना मेट्रो प्रवास करता आलेला नाही. परंतु नवी मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

अशी असणार नवी मुंबई मेट्रो सेवा

नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंधार असा असणार आहे. हा टप्पा ११.१ किमीचा असणार आहे. तळोजा येथे ११ स्थानके आणि कार डेपो आहे. नवी मुंबई मेट्रो १ मध्ये प्रवासादरम्यान २ किमीच्या अंतरासाठी १० रुपये तर २ ते ४ किमीसाठी १५ रुपये भाडे, ४ ते ६ किमीसाठी २० रुपये, ६ ते ८ किमीसाठी २५ रुपये, ८ ते १० किमीसाठी ३० रुपये आणि १० किमी साठी अधिकचे ४० रुपये भाडे द्यावे लागणार असल्याचे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in