नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ १५ ऑगस्टला होणार

नवी मुंबईच्या दक्षिण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने चार मेट्रो मार्गाची आखणी केली
नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ १५ ऑगस्टला होणार
Published on

बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रोच्या शुभारंभाबद्दल विविध चर्चा सुरू असतानाच येत्या १५ ऑगस्ट रोजी ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई मेट्रोची सद्य:स्थिती जाणून घेतली असून, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुढील महिन्यात नवी मुंबईतील या पहिल्या मेट्रो मार्गाचा शुभारंभ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त ठरविला जाण्याची शक्यता असून मेट्रोबाबत सर्व तयारी झाल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबईच्या दक्षिण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने चार मेट्रो मार्गाची आखणी केली आहे. त्यातील बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू करण्यात आले आहे; मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे चार वर्षांत पूर्ण व्हायला हवे ते काम तब्ब्ल १० वर्षे लांबले आहे. अशातच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे काम केले. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन ऐवजी महामेट्रोला या प्रकल्पावर देखरेख व अभियंता साहाय्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या या प्रकल्पातील खारघर ते पेंधर या पाच किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील अर्धा टप्पा पूर्ण करण्यास यश आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in