Navi Mumbai : पोटच्या मुलींना वडिलांनीच लोटले वेश्याव्यवसायात; दोघा अल्पवयीन मुलींची सुटका

कोपरखैरणे येथे राहणाऱया एका व्यक्तीने आपल्या १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना स्वतच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Navi Mumbai : पोटच्या मुलींना वडिलांनीच  लोटले वेश्याव्यवसायात; दोघा अल्पवयीन मुलींची सुटका
Navi Mumbai : पोटच्या मुलींना वडिलांनीच लोटले वेश्याव्यवसायात; दोघा अल्पवयीन मुलींची सुटका
Published on

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे राहणाऱया एका व्यक्तीने आपल्या १६ आणि १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना स्वतच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी बेलापूर येथे केलेल्या कारवाईदरम्यान दोन अल्पवयीन मुलींची सुटका केल्यानंतर नराधम पित्याचा काळजाचा थरकाप उडवणारा चेहरा समोर आला आहे. पोलिसांनी नराधम पित्यासह एका दलालावर गुन्हा दाखल करुन मुली पुरविणाऱ्या दलालाला अटक केली आहे.

हरीश नावाचा दलाल अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी पुरवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. धक्कादायक बाब म्हणजे या मुली वयाने लहान असल्याने त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने दलाल या अल्पवयीन मुलींना ग्राहकाच्या सोयीनुसार हव्या त्या ठिकाणी पोहोचवत असल्याचे तसेच एका मुलीचा सौदा तब्बल १ लाख ५० हजारांना ठरवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून दलाल हरीश छारी (२७) याच्याशी संपर्क साधला. तो रात्री सीबीडी बेलापूर येथे मुलींना घेऊन आला असता त्याला कक्षाच्या पथकाने ताब्यात घेतले.

logo
marathi.freepressjournal.in