नवी मुंबई: 'रेप' केसला नाट्यमय वळण; आईसह बॉयफ्रेंडवर FIR; ६ वर्षांच्या मुलालाच 'तो' व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला

पनवेल सत्र न्यायालयात एका बलात्काराच्या खटल्याला नाट्यमय वळण मिळाल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई: 'रेप' केसला नाट्यमय वळण; आईसह बॉयफ्रेंडवर FIR; ६ वर्षांच्या मुलालाच 'तो' व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला

पनवेल सत्र न्यायालयात एका बलात्काराच्या खटल्याला नाट्यमय वळण मिळाल्याचे समोर आले आहे. सहा वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आई आणि प्रियकराचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना महिला आणि पुरुषाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

'मिड-डे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, कोर्टाच्या आदेशानंतर उरण पोलिसांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलाला आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ बनवण्यास सांगणारी महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेने हाच व्हिडिओ तिच्या प्रियकराच्या विरोधात बलात्काराच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी वापरला होता. उल्लेखनीय म्हणजे पतीला तिच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर महिलेने हा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 मार्च ते 3 एप्रिल 2024 दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास महिनाभरापूर्वी उरण पोलिसांनी 25 वर्षीय महिलेच्या माहितीवरून एका 35 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

"गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात सुनावणीदरम्यान, पुराव्याचा भाग म्हणून पीडितेने दोघांचा एक व्हिडिओ सादर केला. व्हिडिओ पाहून कोर्टाने व्हिडिओच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केला. तेव्हा महिलेने कबुली दिली की, व्हिडिओ क्लिप तिच्या मुलाने आरोपी आणि स्वतःच्या सांगण्यावरून बनवली आहे." असे उरणमधील एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना मुलाला न्यायालयात हजर करण्यास सांगितले. नंतर पोलिसांना आई आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले.

न्यायालयाच्या सूचनेनंतर उरण पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली. चौकशीदरम्यान महिलेने पोलिसांना सांगितले की तिचा पती सहा महिन्यांपूर्वी तिला सोडून गेला आणि तेव्हापासून ती तिच्या मुलासोबत राहत होती. विवाहबाह्य संबंध हेच त्यांच्या विभक्त होण्याचे कारण असू शकते आणि पतीप्रती असलेली आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी तिने प्रियकरावर गुन्हा नोंदवला असावा असा संशय आता पोलिसांना आहे.

उरण पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. "नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे," असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

"गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात सुनावणीदरम्यान पुरावा म्हणून महिलेने व्हिडिओ सादर केला होता. व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर आणि व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्याबाबत कोर्टाने विचारले असता महिलेने तिच्या मुलानेच आरोपीच्या व स्वतःच्या सांगण्यावरुन व्हिडिओ बनवल्याची कबुली दिली." - पोलिस अधिकारी, उरण पोलिस स्थानक

logo
marathi.freepressjournal.in