Navi Mumbai : पाण्यातील करंटमुळे दोन तरुणी गंभीर; नवी मुंबई नेरूळमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या.
पाण्यातील करंटमुळे दोन तरुणी गंभीर; नवी मुंबई नेरूळमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
पाण्यातील करंटमुळे दोन तरुणी गंभीर; नवी मुंबई नेरूळमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना X
Published on

नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या.

नेरूळच्या एल.पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. याच पाण्यात अचानक विजेचा करंट पसरल्याने तिथून पायी जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणींना विजेचा तीव्र झटका बसला. हा झटका इतका भीषण होता की, दोघीही क्षणात रस्त्यावरील पाण्यातच बेशुद्ध होऊन पडल्या. हा प्रकार पाहताच परिसरात एकच पळापळ आणि खळबळ उडाली.

दोघींनाही केले रुग्णालयात दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही विद्यार्थिनींना पाण्यातून बाहेर काढले. दोघींचीही प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तातडीने रिक्षात घालून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in