नवी मुंबई : नायजेरियन नागरिक अटकेत

पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील तळोजा भागात मागील ८ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या अमॉक इके जॉर्ज (४८) या नायजेरीयन नागरिकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
नवी मुंबई : नायजेरियन नागरिक अटकेत
Published on

नवी मुंबई : पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील तळोजा भागात मागील ८ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या अमॉक इके जॉर्ज (४८) या नायजेरीयन नागरिकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तसेच या नायजेरीयन नागरिकाची माहिती पोलिसांना न देता, त्याला राहण्यासाठी फ्लॅट देणाऱ्या फ्लॅट मालकिण मालकीणी विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे या नायजेरियन नागरिकाने भारतीय महिलेसोबत विवाह देखील केल्याचे उघडकीस आली आहे.

तळोजा फेज-२ भागांमध्ये राहणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाने राहत्या घरामध्ये अमली पदार्थाची साठवणूक करून ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी तळोजा सेक्टर-२३ मधील द्विशा हाईट्स या इमारतीतील ११ व्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा मारला. यावेळी सदर घरामध्ये अमॉक इके जॉर्ज (४८) व मेरी नग्बकर (४४) हे दोघे नायजेरियन नागरिक आढळून आले. या दोघांविरोधात परदेशी गुन्हा दाखल करून नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in