नवी मुंबई पोलीस दलातील ६० अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी मुंबई पोलीस दलातील ६० अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
Published on

नवी मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोग व राज्याचे पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पोलीस आयुक्तालयातील ६० पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

यात २ सहाय्यक पोलीस आयुक्त,२० पोलीस निरीक्षक, १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि २० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे. तसेच त्यांच्या जागेवर सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ (प्रभारी अधिकारी रबाळे पोलीस ठाणे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (प्रभारी अधिकारी न्हावा-शेवा पोलीस ठाणे), कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर (वाहतूक शाखा), पोलीस निरीक्षक मधूकर भटे यांची (प्रभारी अधिकारी वाशी पोलीस ठाणे), येथे बदली करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (प्रभारी अधिकारी कळंबोली पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक सतीश कदम (प्रभारी अधिकारी एनआरआय पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक औंदुंबर पाटील (प्रभारी अधिकारी कोपरखैरणे पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक विजय पन्हाळे (प्रभारी अधिकारी सानपाडा पोलीस ठाणे), सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोसले यांची (आरबीआय सुरक्षा शाखा), वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले, पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी या चौघांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

तसेच पोलीस निरीक्षक भागुजी औटी (विशेष शाखा), पोलीस निरीक्षक रमेश जाधव (तळोजा पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड (वाशी पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (खांदेश्वर पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक पराग सोनावणे (नियंत्रण कक्ष), पोलीस निरीक्षक अतुल आहेर (कळंबोली पोलीस स्टेशन),महिला पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे (वाहतूक शाखा) यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांप्रमाणेच नवी मुंबई पोलीस दलातील १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व २० पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोग व राज्याचे पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार स्विकारावे.

- संजय कुमार पाटील (पोलीस उपायुक्त-मुख्यालय)

logo
marathi.freepressjournal.in