Navi Mumbai : प्री-स्कूलमध्ये बालकाला मारहाण; मुलाची केली शाळेतूनही हकालपट्टी

सीबीडी बेलापूर, सेक्टर - ८ मधील एका प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ वर्षीय मुलाला प्री-स्कूलमधील एका महिलेने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलाच्या आईने प्री-स्कूल चालक महिलेला जाब विचारला असता, त्यांनी...
Navi Mumbai : प्री-स्कूलमध्ये बालकाला मारहाण; मुलाची केली शाळेतूनही हकालपट्टी | प्रातिनिधिक छायाचित्र
Navi Mumbai : प्री-स्कूलमध्ये बालकाला मारहाण; मुलाची केली शाळेतूनही हकालपट्टी | प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर, सेक्टर - ८ मधील एका प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ वर्षीय मुलाला प्री-स्कूलमधील एका महिलेने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलाच्या आईने प्री-स्कूल चालक महिलेला जाब विचारला असता, त्यांनी मुलालाच शाळेतून काढून टाकले आहे. या प्री स्कूलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलाच्या आईने केली आहे.

या घटनेतील ३ वर्षीय पीडित मुलगा सीबीडी बेलापूर परिसरात राहण्यास असून तो सेक्टर ८ मधील एका प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. गत ८ ऑक्टोबर रोजी पीडित विद्यार्थ्याने खेळताना दुसऱ्या विद्यार्थ्यांचे केस पकडले. या कारणावरून तेथील शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने या शाळेला ई-मेल पाठवून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सुरुवातीला प्री स्कूल चालकांनी वेगवेगळी कारणे देत सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. मात्र, नंतर त्यांनी फुटेज दाखवले.

प्री-स्कूलच्या प्रतिनीधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात पीडित मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून प्री स्कूल चालक-मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

अरुण पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

logo
marathi.freepressjournal.in