Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू राहणार

महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील ८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार तसेच गुढीपाडवा, श्रीराम नवमी आणि महावीर जयंती या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू राहणार
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक असल्याने नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील ८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार तसेच गुढीपाडवा, श्रीराम नवमी आणि महावीर जयंती या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांसाठी ८ विभागीय कर संकलन कार्यालयांमध्ये कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन कर भरण्याची सुविधा ३१ मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. शहराच्या विकासासाठी करदात्यांनी वेळेत कर भरावा तसेच जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत मालमत्ता कर तातडीने भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in