

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईला “भविष्यातील शहर” म्हणून ओळखले जाते. मात्र येत्या फेब्रुवारीमध्ये ते भविष्य प्रत्यक्षात साकार होताना पाहायला मिळणार आहे. CREDAI BANM RAIGAD वेल्फेअर असोसिएशन तर्फे आयोजित ९वा प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हा ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान कामोठे (खांडेश्वर रेल्वे स्थानकासमोर) येथे पार पडणार असून, नवी मुंबई आणि रायगडच्या रिअल इस्टेट तसेच पायाभूत सुविधांच्या विकास प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
दरवर्षी या एक्स्पोला एका आवृत्तीत ५० हजारांहून अधिक नागरिक भेट देतात. यंदा परिसरातील झपाट्याने बदलणाऱ्या पायाभूत सुविधा आणि वाढत्या गृहखरेदीदारांच्या उत्साहामुळे हा आकडा दुप्पट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा एक्स्पो नवी मुंबई-रायगडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्स्पो ठरणार आहे.
या एक्स्पोमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात हजारो व्यवहार झाले असून शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून रोजगारनिर्मितीतही मोठा वाटा उचलला गेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा प्रॉपर्टी एक्स्पो नवी मुंबई आणि रायगडसाठी सरकारच्या नागरी विकास धोरणाशी सुसंगत असून, नियोजित विकास, ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट, परवडणारी घरे आणि पायाभूत सुविधांवर आधारित विस्तार यांना चालना देणारा एक प्रभावी मंच ठरत आहे. त्यामुळे हा केवळ रिअल इस्टेट कार्यक्रम न राहता, शहरी नियोजन आणि सार्वजनिक धोरणांना पूरक व्यासपीठ बनला आहे.
आता केवळ आश्वासन नाही- प्रत्यक्ष वास्तव
या एक्स्पोचे ब्रीदवाक्य “अपना टाइम आ गया!” हे केवळ घोषवाक्य नसून आजच्या वास्तवाचे प्रतिबिंब आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होण्याच्या उंबरठ्यावर आहे, अटल सेतूमुळे दक्षिण मुंबईशी प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि मेट्रो नेटवर्कमुळे कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई आता अधिकृतपणे आपल्या सुवर्ण वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री आणि स्टाईल आयकॉन शिल्पा शेट्टी विशेष उपस्थित राहणार असून, हजारो गृहखरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी त्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
९वा प्रॉपर्टी एक्स्पो म्हणजे केवळ घरांची खरेदी नव्हे, तर नव्या सुरुवातीचा उत्सव आहे. एक्स्पो दरम्यान स्पॉट बुकिंग करणाऱ्या पाहुण्यांसाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी असणार आहे. प्रत्येक गृहखरेदीदारासाठी पारदर्शकता, पर्याय आणि मूल्य यांचा समतोल राखण्यासाठी हा एक्स्पो आखण्यात आला आहे. ७० हून अधिक विकासक आणि ३०० पेक्षा जास्त प्रकल्पांमुळे खरेदीदारांना एकाच ठिकाणी तुलना करून आत्मविश्वासाने निर्णय घेता येईल, असे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ चे संयोजक हर्निश करिया यांनी म्हटले आहे.
सह-संयोजक पुलिन परिख म्हणाले, आजचा खरेदीदार माहितीपूर्ण आणि मूल्याभिमुख आहे. आमचा उद्देश केवळ प्रॉपर्टी प्रदर्शन नव्हे, तर विश्वासार्ह प्रकल्प, उत्कृष्ट ऑफर्स आणि ग्राहकांना सक्षम करणारे व्यासपीठ निर्माण करणे हा आहे. सह-संयोजक रुशिश तिंबडिया यांनी नमूद केले. हा एक्स्पो नवी मुंबई आणि रायगडच्या वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक भेट देणाऱ्यासाठी सहज, पारदर्शक आणि समाधानकारक अनुभव देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई आणि रायगडमध्ये एका पिढीत एकदाच घडणारा परिवर्तनाचा काळ सुरू आहे. हा एक्स्पो केवळ मालमत्ता विक्रीपुरता मर्यादित नसून पायाभूत सुविधा, जीवनशैली आणि गुंतवणुकीची क्षमता यांचा संगम दाखवणारा मंच आहे. ९वा प्रॉपर्टी एक्स्पो हा आपल्या प्रदेशाच्या नव्या विकासपर्वाची सुरुवात आहे.
जीतू जगवानी,अध्यक्ष CREDAI-BANM रायगड