नवी मुंबई 'आरक्षण सोडत' ११ नोव्हेंबरला; १७ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
नवी मुंबई 'आरक्षण सोडत' ११ नोव्हेंबरला; १७ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण जाहीर
नवी मुंबई 'आरक्षण सोडत' ११ नोव्हेंबरला; १७ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण जाहीर
Published on

नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात काढली जाणार आहे.

त्यानंतर १७ नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. आयुक्तांच्या अधिकृत बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद करण्यात आली आहे. एकाच

मोबाईल क्रमांकावर अनेक मतदार नोंदवले गेल्याचे उघडकीस आले आहे.

काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे व शौचालयांच्या पत्त्यावर मतदारांची नोंदणी असल्याचे दिसून आले आहे. या विसंगतींमुळे मतदार यादी अंतिम होण्याआधीच निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मूळतः ६ नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या प्रारूप मतदार याद्या आता १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंतची यादी ग्राह्य धरण्याची मनसेसह अनेक राजकीय पक्षांची मागणी होती; पण निवडणूक आयोगाने १ जुलै पर्यंतची यादीच ग्राह्य धरली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या आणि त्याचा राजकीय समीकरणांवर होणारा परिणाम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in