Navi Mumbai : सीवूड्समध्ये बुरखाधारी त्रिकुटाकडून ज्वेलर्सवर दरोडा; पिस्तुलच्या धाकाने २१ तोळे सोने लुटले

सीवूड्स परिसरातील संगम गोल्ड ज्वेलर्स या तयार सोन्या-चांदीच्या दुकानावर सोमवारी सकाळी थरारक दरोड्याची घटना घडली. बुरखा घालून आलेल्या तिघा लुटारूंनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातून २१ तोळे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपयांची रोकड लुटून पलायन केले.
सीवूड्समध्ये बुरखाधारी त्रिकुटाकडून ज्वेलर्सवर दरोडा; पिस्तुलच्या धाकाने २१ तोळे सोने लुटले
सीवूड्समध्ये बुरखाधारी त्रिकुटाकडून ज्वेलर्सवर दरोडा; पिस्तुलच्या धाकाने २१ तोळे सोने लुटले
Published on

नवी मुंबई : सीवूड्स परिसरातील संगम गोल्ड ज्वेलर्स या तयार सोन्या-चांदीच्या दुकानावर सोमवारी सकाळी थरारक दरोड्याची घटना घडली. बुरखा घालून आलेल्या तिघा लुटारूंनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातून २१ तोळे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपयांची रोकड लुटून पलायन केले.

या दरोड्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही फुटजेमध्ये कैद झाली असून एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी सदर लुटारूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनआरआय पोलिसांसह क्राइम ब्रँचकडुन या लुटारूंचा शोध घेण्यात येत आहे.

संगम गोल्ड ज्वेलर्सचे मालक नारायणलाल शर्मा यांनी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडले. नेहमीप्रमाणे त्यांनी दुकानाची साफसफाई करून दागिने मांडले आणि पूजेला सुरुवात केली होती. याचवेळी बुरखा परिधान केलेले तिघे लुटारू दुकानात शिरले. त्यांनी शर्मा यांना पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील २१ तोळे वजनाचे मौल्यवान दागिने व ३५ हजाराची रोकड लुटली. दरोड्यानंतर तिघेही लुटारू टी-परमिट कारमधुन घटनास्थळावरून फरार झाले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, सदर लुटारू कारमधून आले होते. ही कार सकाळी नेरूळ परिसरात फिरत असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. दरोड्यानंतर हीच कार सायन-पनवेल मार्गावरुन पनवेलच्या दिशेने जात असल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in