नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

घणसोली येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अज्ञात तरुणाने सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यावर ऐरोली येथील एका घरामध्ये लैंगिक अत्याचार करून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अज्ञात तरुणाने सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यावर ऐरोली येथील एका घरामध्ये लैंगिक अत्याचार करून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. रबाळे पोलिसांनी या अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील पीडित मुलगी घणसोली येथे कुटुंबासह राहत असून सध्या ती शिक्षण सोडून घरीच असते. एप्रिल २०२४ मध्ये अज्ञात तरुणाने या मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने गत ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत पीडित मुलीला ऐरोलीतील एका चाळीतील घरामध्ये बोलावून तिच्यासोबत शरीरसंबध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या आईने तिला महापालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यानंतर पीडित मुलगी ३ महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in