नवी मुंबईत ‘शिवसेना’ स्वबळावर? जिल्हाप्रमुख पाटकर यांचे संकेत

नवी मुंबई महापालिका निवडणूक ‘भाजप-शिवसेना युती’च्या चर्चेत आम्हाला डावलले जात आहे. आम्हाला कुठे इच्छा आहे भाजपसोबत जाण्याची. त्यामुळे आले तर ठिक नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिला आहे.
नवी मुंबईत ‘शिवसेना’ स्वबळावर? जिल्हाप्रमुख पाटकर यांचे संकेत
नवी मुंबईत ‘शिवसेना’ स्वबळावर? जिल्हाप्रमुख पाटकर यांचे संकेत
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणूक ‘भाजप-शिवसेना युती’च्या चर्चेत आम्हाला डावलले जात आहे. आम्हाला कुठे इच्छा आहे भाजपसोबत जाण्याची. त्यामुळे आले तर ठिक नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना पक्ष आता महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या पूर्व संध्येपर्यंत ‘भाजप-शिवसेना युती'च्या चर्चची गुऱ्हाळे कुटली जात होती. तर दुसरीकडे युती होवो अथवा न होवो आता थांबायचे नाही, असा निर्धार करीत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातील काही उमेदवारांनी २९ डिसेंबर रोजी आपले उमेदवारी अर्ज देखील भरले.

वास्तविक पाहता नवी मुंबईत ‘शिवसेना-भाजप युती'बाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध होता. त्यामुळे आता युती तुटल्यातच जमा असून असे स्पष्ट संकेत जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिले आहेत.

आम्हाला युतीची गरज नाही

नवी मुंबईत ‘सेना-भाजप युती'बाबत चर्चा सुरू असताना आम्हाला ‘युती'त डावलले जात असून आम्हाला देखील ‘युती'ची इच्छा नाही. त्यामुळे आमचे नवी मुंबईतील सर्व १११ जागांवर उमेदवार तयार असून त्यांच्या अर्जांची छाननी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अशीच वेळ आली तर आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकू देखील, असे किशोर पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपा-शिवसेना आता स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल

युती बाबत अद्याप ठाम निर्णय नाही. त्यात गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा मुलगा अवधूत हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नामांकनचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनीही आज शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वाशीमधून त्यांचा मुलगा अवधूत हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती मोरे यांनी दिली. त्यामुळे शेवटच्या क्षणी उपनेते सारख्या पदाच्या व्यक्तीने राजकीय उडी मारल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त एक माजी नगरसेवक होता. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपली ताकद दाखवत रॅली काढली. ऐरोली, घणसोली बेलापूर, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळसह संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या युतीची घोषणा झाली नसली तरी, आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शेवटच्या क्षणी युतीची अटकळ बांधली जात आहे. तथापि, जर युती झाली नाही तर उर्वरित उमेदवार उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. नवी मुंबईत, भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्या २८ पॅनलमधील १११ नगरसेवक जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत, ज्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. जर युती झाली नाही, तर उद्या आणखी लोक वेगवेगळ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in