१० वीची परीक्षा संपल्यावर शाळेबाहेर हाणामारी: विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई

वाद संपवण्यासाठी तिसरा समूहमध्ये पडला व त्यांना समजावून सांगू लागला. मात्र त्यांच्यातही तुम्हाला काय करायचे आमचे आम्ही पाहून घेऊ म्हणून वाद सुरू झाले. हे वाद मिटवण्यासाठी म्हणून चौथा समूहातील आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांनी मध्यस्थी केली. पण...
१० वीची परीक्षा संपल्यावर शाळेबाहेर हाणामारी: विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी सहा विद्यार्थ्यांवर कारवाई

नवी मुंबई : तुर्भे येथील सामंत विद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या चार गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला होता तर एक गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

तुर्भे गावातील सामंत महाविद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. बुधवारी परीक्षा संपल्यावर सर्व विद्यार्थी बाहेर पडले. काही अंतरावर दोन विद्यार्थ्यांच्या गटात काही तरी क्षुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली. त्यांच्यातील वाद संपवण्यासाठी तिसरा समूहमध्ये पडला व त्यांना समजावून सांगू लागला. मात्र त्यांच्यातही तुम्हाला काय करायचे आमचे आम्ही पाहून घेऊ म्हणून वाद सुरू झाले. हे वाद मिटवण्यासाठी म्हणून चौथा समूहातील आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांनी मध्यस्थी केली. मात्र त्यांनाच उपस्थित काही मुलांनी मारहाण केली त्यात देवांगच्या नाकारावर जबर जखम झाली तर भोसले बेशुद्ध पडला. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता भोसले याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटने नंतर एपीएमसी पोलिसांनी दहा ते बारा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. मात्र प्रत्यक्ष हाणामारीत ज्यांचा सहभाग आहे अशा सहा जणांना पुढील कारवाई साठी थांबून घेतले तर अन्य विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले आहे. गुरुवारी त्या सहा विद्यार्थ्यांना न्यालयात हजर केले प्राथमिक अंदाजानुसार भोसले याचा मृत्यू हा अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने झाला असावा अशी माहिती समोर आली आहे.

मात्र अंतिम वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. सदर वैद्यकीय अहवाल आल्यावरच मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होईल. अशी माहिती एपीएमसी पोलिसांनी दिली आहे. या घटनेने भोसले कुटुंबावरच नव्हे तर परिसरात शाळेत शोककळा पसरली आहे. सध्या भोसले कुटुंबीय आपल्या मूळ गावी गेलेले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in