नवी मुंबई ते मंत्रालय व्हाया अटल सेतू एसी बससेवेचे प्रवाशांना वेध

जानेवारीमध्ये अटल पूल लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासूनच नवी मुंबईच्या विविध भागांतून मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर असा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूमार्ग नवीन बससेवा सुरू होण्याचे वेध लागले आहेत.
नवी मुंबई ते मंत्रालय व्हाया अटल सेतू एसी बससेवेचे प्रवाशांना वेध
Published on

टीपीजी कृष्णन / मुंबई

बेस्टच्या नवी मुंबई ते कुलाबा दरम्यानच्या चलो एसी बससेवेला प्रवाशांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, त्याचधर्तीवर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) आता अटल सेतूवरून नवी मुंबई ते मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान एसी बससेवा सुरू करण्याचे वेध लागले आहेत.

एनएमएमटीमार्फत अटल सेतू मार्गे नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्टेशन, खारघर से.-३५, सीबीडी बस डेपो, नेरूळ बस डेपो, उलवे नोड आणि खारकोपर रेल्वे स्टेशन ते मंत्रालय/ वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड दरम्यान एसी बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेचे प्रवासी भाडे अंदाजे ६० ते ११० रुपये असेल.

ईस्टर्न फ्री वे मार्गावरून नवी मुंबई आणि मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर या दरम्यानच्या मार्गावर धावणाऱ्या एनएमएमटीच्या १०८ नंबरच्या बसमधील प्रवाशांना अटल सेतूवरून सुरू करावयाच्या प्रस्तावित एसी बस सेवेविषयीची माहिती देऊन त्यांची मते आजमाविण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण अर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच, नवी मुंबई ते मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हाया अटल सेतू दरम्यानच्या प्रस्तावित मार्गाविषयी आपला प्रतिसाद कळविण्याचे आवाहन करण्यात आले. या मार्गामुळे प्रवाशांचा वेळही वाचेल व त्यांना आपापल्या कार्यालयात वेळेआधीच पोहोचता येणे शक्य होईल, असे सांगून प्रवाशांनी आपल्या सकारात्मक भावना व्यक्त केल्या.

यावर्षी जानेवारीमध्ये अटल पूल लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासूनच नवी मुंबईच्या विविध भागांतून मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर असा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूमार्ग नवीन बससेवा सुरू होण्याचे वेध लागले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in